शाळाबद्दलची माहिती

शाळेचा इतिहास : संगमनेर शहर हे अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर वसलेले आहे. विठ्ठल सुंदर  परशरामीच्या बुद्धीवैभवाच्या व कर्तव्याचा वारसा घेतलेले शहर आहे. १९६० मध्येच नगरपालिकेची स्थापना करून वाचन, तोंडी, हिशोब, पाठांतर बालबोध व मोठी अक्षरे शिकवणारी पाठशाला अस्तीत्वात आली. त्या वेळचे नगराध्यक्ष श्री. भगवंतराव मुळे व स्कूल बोर्डाचे चेअरमन केशव बापू परशरामी यांनी संगमनेर नगरपालिकेच्या स्कूल बोर्डाची रचना करून मराठी शाळेला इंग्रजी शिक्षणाचे वर्ग जोडले. १९८५ साली सुरु झालेल्या अशा  अग्लो व्हर्नाक्युलर शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री.यशवंत वामन उर्फ तात्यासाहेब कोकीळ हे होते. १८८५ साली श्री साने डे, एज्युकेशनल ऑफिसर यांनी वार्षिक तपासणी करून शाळेला ‘एडेड स्कूल’ मान्यता दिली त्यावर्षी (१८९३) मध्ये ३०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आली. विद्यार्थी संख्या ७३ होती. शाळेचा पहिल्या वर्षातील आलेख वरखाली वळणारा होता. परंतु याचवर्षी श्री. शिवनारायणजी नावंदर व श्री. ना. इ रानडे हे दोन स्कॉलरशिप परीक्षेत नगर जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उतीर्ण झाले.

काही वर्षांनंतर नगरपालिका व विद्यालय यातील तणावामुळे १९४० च्या सुरुवातीस त्यावेळेचे नगरपालिकेचे प्रशासन श्री.डी.पी. वाळुंजकर यांनी हे विद्यालय बाहेरील संस्थेकडे चालविण्यास द्यावयाचे ठरविले. त्यानुसार ३१ डिसेंबर १९४० ला प्रि.टी.ए. कुलकर्णी यांच्यात करार होऊन १ जानेवारी १९४१ पासून गोखले एज्यूकेशन सोसायटी, नाशिक यांच्या ताब्यात आली. कोर्टाच्या नियमानुसार श्री.मो.के. शाळीग्राम पुन्हा शाळेत मुख्याध्यापकाचे काम पाहू लागले.

सन १९७३ पासून आजतागायत सर डॉ.मो.स. गोसावी हे गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत आहेत.

21 ऑगस्ट १९७५ रोजी नामदार श्री. आण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते विद्यालयाच्या सुसज्ज ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.

शाळेची स्थापना :
१८८५ मध्ये संगमनेर नगरपालिकेमार्फत स्थापना
१९४१ मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक यांचे कडे वर्ग

शाळेचे देणगीदार :सर दिनशा माणिकजी पेटीट