मुख्याध्यापक संदेश
गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित सर डी.एम.पेटीट हायस्कूल,संगमनेर. पेटीट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे प्रवरेच्या काठावर वसलेले आहे.संगमनेर हे शहर राजकीय,सामाजिक,शैषणिक व नैतिक दृष्ट्या सर्व संपन्न आहे.आमच्या शाळेची स्थापना 1885 साली झाली.संगमनेर शहरातील प्रथम शाळा म्हणून आजतागायत सर्व कार्य संपन्न म्हणून कार्यरत आहे.31 डिसेंबर 1940 ला प्रि.टी.ए.कुलकर्णी यांच्यात करार होऊन 1 जानेवारी 1941पासून गोखले एज्युकेशन सोसायटी,नाशिक यांच्या ताब्यात आली.सन 1973 पासून आजतागायत सर डॉ.मो.स.गोसावी सर(सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची परंपरा यशस्वीपणे पार पाडीत आहे.
आमच्या विद्यालयात व ज्यु.कॉलेजमध्ये क्रीडा,सांस्कृतिक,शालान्त बाह्य परीक्षा,चित्रकला,एन.टी.एस, एन.एम.एम.एस, 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, व इतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या परीक्षा आयोजित केल्या जातात. आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद व इ.9 वी.ते 12 वी.साठी RMSA अंतर्गत शिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत.
प्रभारी मुख्याध्यापक
श्री.चौधरी आर.एम.